ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा

केंद्राची योजना : ई- श्रम कार्डसाठी नोंदणी केली का ?

 देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई- श्रम कार्ड बनवले जाते. ई- श्रम कार्ड स्कीमद्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.नवीन नोंदणी करणाऱ्या कामगारांना एक वर्षासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. कामगार काम करण्यास अक्षम झाल्यास त्याला एक लाख रुपये दिले जाते. २ लाखाच्या विमा संरक्षणासाठी एक रुपयाचेही प्रीमियम भरावे लागत नाही. तसेच सरकारकडून श्रमिकाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना ३ हजार रुपये महिना पेन्शन दिली जाते. गरीब वर्गातील वयोवृद्धांसाठी हा मोठा दिलासा आहे. तसेच वेगवेगळे राज्य सरकार सुद्धा आपल्या ई-श्रम कार्ड धारकांना वेगवेगळे फायदे देत आहे. सध्या ई श्रमिक कार्ड धारकांना ५०० रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

काय आहे ई श्रम पोर्टल?

देशभरातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची शासनाकडे नोंद असावी यासाठी केंद्र शासनाच्या कामगार कल्याण मंत्रालयाने हे पोर्टल तयार केले आहे. विम्यासाठी एकही पैसा नाही २,८०,२४२ कामगारांची नोंदणी ई- श्रम पोर्टलवर गडचिराली जिल्ह्यातील एकूण २ लाख ८० हजार २४२ कामगारांनी नोंदणी केली आहे. संबंधित पोर्टलवर ही नोंदणी सुरूच असते. ई- श्रम पोर्टलवर एकदा नोंदणी केल्यानंतर नोंदणी केलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत संबंधित कामगाराला अपघाती विम्याचे संरक्षण दिले जाते. यासाठी एकही पैसा लागत नाही.