ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

१ जुलै पासून पोलीस भरतीचे प्रशिक्षण सुरु होणार – अप्पर पोलीस महासंचालकानीं दिली माहिती

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु होणार आहे. यामध्ये राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण होईल अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली. पहा आणखी काय म्हणाले राजकुमार व्हटकर  हि भरती ६ हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. तसेच हे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांवर सुरु […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मुंबई, दि.14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.             यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील  जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील २७ लाख नागरिकांना लाभ देणारा ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्री

एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५  हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.             महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य रोजगार विदर्भ

प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’

कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते व या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट आर्थिक तरतूद केली जाते. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा मुंबई, दि. १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून  वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी मुंबई, दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील अशोक स्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 मुंबई, दि 13 : चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.             खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे आव्हान नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे – राज्यपाल रमेश बैस

पदवीधरांनी स्टार्टअप निर्मितीत पुढाकार घेऊन विकासात योगदान द्यावे – दीक्षान्त समारंभात राज्यपालांचे आवाहन नागपूर, दि १३ : जगात कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज आहे. ही एक संधी मानून जगाची गरज पूर्ण करण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या मदतीने कुशल मनुष्यबळ निर्मितीत जग व भारतदेशादरम्यान दुवा म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल तथा […]