
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न*
*६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड*
गडचिरोली, दि. १० (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा शुक्रवार, दि. १० जुलै रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथे उत्साहात पार पडला.
मेळाव्यात १५० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. Vaibhav Enterprises, Talent Corp आणि AISA India या तीन नामांकित उद्योग संस्थांनी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. यावेळी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखतीनंतर ६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकाधिक युवक-युवतींनी अशा रोजगार मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.





