शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न ९ रुग्णांलयातील गट ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट – ड संवर्गातील मंजूर पदापैकी […]
ताज्या बातम्या
आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास […]
विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे यंत्रणेला आढावा सभेत निर्देश
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला एकूण ६०४ कोटीचा निधी संबंधित यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करावा व लोककल्याणकारी योजनांसाठी प्राप्त निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ […]
भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. 19 – भविष्यवेधी विकास आणि नियोजन प्रक्रियेत गतिमानता आणून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्ततेला चालना देण्यासाठी राज्यातील भूस्थानिक (Geo-spatial) तंत्रज्ञानाची आणि माहिती तंत्रज्ञानांची सांगड घालून व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘महाटेक’ संस्थेची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भू स्थानिक (Geo-spatial) तंत्रज्ञानासंदर्भात आज विधीमंडळातील कार्यालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. […]
महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण; स्वीडिश कंपन्यांना धोरणात्मक पाठबळ देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत आणि स्वीडन यांचे अनेक वर्षांचे द्विपक्षीय तसेच राजनैतिक संबंध आहेत. स्वीडिश कंपन्या गेल्या शंभर वर्षांपासून भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. याठिकाणी ज्या स्वीडिश कंपन्या उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना सर्व आवश्यक धोरणात्मक पाठबळ देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे स्वीडन […]
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
नागरिकांसाठी मोफत सौरऊर्जेची संधी; अनुदानासह कर्ज सुविधाही उपलब्ध गडचिरोली दि.17– केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. सौर विद्युत प्रकल्प एकदा बसवल्यानंतर त्यातून 25 ते 30 वर्षापर्यंत सौर विद्युत […]
भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्च दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन
गडचिरोली, दि. 16 – भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले. जलसंपदा विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्च पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली […]
मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन, हरमनप्रीत कौरच्या संघाने घडवला इतिहास; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा WPL चे जेतेपद पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला. मुंबईच्या संपूर्ण संघाने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात आपले योगदान दिले. दिल्लीच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत येऊन विजयापासून दूर राहिला आहे. दिल्लीच्या पदरी सलग तिसऱ्यांदा निराशा पडली आहे. मुंबई इंडियन्स संघ WPL मध्ये दोन […]
बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. 32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि […]