१७ ते ३० जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार; प्रवेश मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पालकांनी १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विद्यालयात ऑफलाइन पद्धतीने […]
ताज्या बातम्या
ग्रामस्थांच्या एकजुटीने घडवला आदर्श; १३ वर्षांपासून दारूमुक्त फुस्की माल गाव
अवैध दारूविक्रीला पूर्णविराम; तंबाखू-खर्र्यावरही बंदी, भांडण-तंटेमुक्त गाव म्हणून परिसरात नवी ओळख मुलचेरा मुलचेरा तालुक्यातील फुस्की माल या छोट्याशा गावाने ग्रामस्थांच्या अभेद्य एकजुटीच्या बळावर समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सुमारे ११० लोकसंख्या असलेल्या या गावात मागील तब्बल १३ वर्षांपासून अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसला असून गावाने ‘दारूमुक्त आणि भांडण-तंटेमुक्त गाव’ अशी वेगळी ओळख निर्माण […]
जुलै अर्धा संपला तरी मुलचेरा तालुक्यात दमदार पावसाचा पत्ता नाही; पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत
मुलचेरा: जुलै महिना अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही मुलचेरा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी शेतांची मशागत, नांगरणी व इतर पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी बियाणे आणि खतेही खरेदी करून ठेवली आहेत. मात्र […]
सिरोंच्यात ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न
सिरोंचा, प्रतिनिधी : सिरोंचा येथील सागर रेड्डी कॉम्प्लेक्समध्ये ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. *या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक श्री. सतीश भोगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेवक श्री. रंजीत नागेश्वर गागापुरवार हे प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते*. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत […]
हरवलेले व चोरीला गेलेले ११ मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश कुरखेडा पोलिसांच्या तांत्रिक तपासातून २ लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत; नागरिकांनी व्यक्त केले समाधान
गडचिरोली गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेले व चोरीला गेलेले एकूण ११ मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित मूळ मालकांना परत सुपूर्द केले. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत […]
गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क; ४० हजार नागरिकांना मोठा दिलासा
गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क; ४० हजार नागरिकांना मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; २१,८२४ एकर जमीन ‘वर्ग-१’ होणार, १० हजार घरे नियमितीकरणाच्या मार्गावर मुंबई | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुनर्वसन कायद्यांतर्गत अनेक वर्षांपूर्वी मिळालेल्या जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर […]
चिचोळा येथे खरीप हंगाम महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न पूर्वनियोजनावर भर देत नैसर्गिक शेतीचा प्रसार
गडचिरोली, : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतीशाळेचा पहिला वर्ग १० जुलै रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला. नैसर्गिक शेतीचा प्रसार, हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि खरीप हंगामाचे योग्य नियोजन याबाबत महिला शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्काची […]
पावसाळ्यात जंगलात रानभाज्यांची रेलचेल; पौष्टिकतेसोबत ग्रामीण भागाला रोजगाराचाही आधार
पावसाळा सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यातील जंगल, डोंगराळ आणि दुर्गम भाग विविध प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्यांनी बहरून जात आहेत. निसर्गाच्या कुशीत कोणत्याही रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टिक, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतात. याचबरोबर त्यांच्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांना हंगामी उत्पन्नाचाही आधार मिळत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच अनुभवी आणि जाणकार […]
IRCTC कडून प्रवाशांना मोठा दिलासा; ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी नवी वेबसाइट १५ जुलैपर्यंत बीटा स्वरूपात येण्याची शक्यता
भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून, प्रवाशांना अधिक वेगवान, सोपी आणि जाहिरातमुक्त सेवा देण्यासाठी IRCTC लवकरच आपल्या नव्या वेबसाइटचे सार्वजनिक बीटा व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. नवीन वेबसाइटमुळे तिकीट बुकिंगदरम्यान येणारा स्लो इंटरफेस, सतत दिसणाऱ्या जाहिराती, गुंतागुंतीचा कॅप्चा आणि तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात […]
राज्यात नर्सिंग शिक्षणाचा मोठा विस्तार; १० नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी, गडचिरोलीसह १० जिल्ह्यांना मोठी संधी
राज्यातील आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नर्सिंग शिक्षण क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात १० नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास तसेच ८ विद्यमान शासकीय जीएनएम (General Nursing and Midwifery) महाविद्यालयांचे बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील […]









