गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

गडचिरोली पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई

पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घरफोडी व जबरी चोरीच्या 02 विविध गुन्ह्रांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन दागिणे फिर्यादींना सुपुर्द

पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे हस्ते एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सुपूर्द सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्रांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करण्यात येऊन सदर गुन्ह्रातील मुद्देमालाचा शोध पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून घेण्यात आला आहे. पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने मालमत्तेविरुद्धच्या दोन गंभीर चोरीच्या गुन्ह्यांचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’   महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर, २०२६ ते ३१ मार्च, २०२७ या कालावधीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न

मुलचेरा:-भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा अंतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली, जि. गडचिरोली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजनेसाठी ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज

मुंबई : अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्जाची अंतिम मुदत ४ सप्टेंबर २०२६ अशी आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक अडचणींमुळे उच्च […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

देशाचा गडचिरोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला; ‘व्हिजन २०४७’मधून सर्वांगीण विकासावर भर गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात आहे. समृद्ध नैसर्गिक व खनिज संपदा, सुधारत असलेली दळणवळण व्यवस्था, औद्योगिक विकास, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून गडचिरोली महाराष्ट्रातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन

कोल्हापूर : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या 44 प्राथमिक आरोग्य व 74 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे. राज्यातील सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवाभाऊंचा डिजिटल शिक्षणाला बळ; ‘विनोबा डिजिटल अॅप’चा ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम; २५ जिल्ह्यांतील ४५ हजार शासकीय शाळा जोडल्या बातमी : मुंबई : राज्यातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला अधिक चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या **’विनोबा डिजिटल अॅप’**ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपचा आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वनाथनगर परिसरात चिखलात बस फसली प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र रोष कायमस्वरूपी उपाययोजना करा

गडचिरोली मुलचेरा: तालुक्यातील कोपरअल्ली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही पडताना दिसून येत आहे. सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस या मार्गावरील चिखलात रुतल्याने जवळपास ७० विद्यार्थी तब्बल तीन तास रस्त्यातच अडकून राहिले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमएच-१४ एलएक्स-६५६९ क्रमांकाची मानव […]

महाराष्ट्र

श्री सिद्धिविनायकाच्या दानपेटीतून १८ कोटींची चोरी? विश्वस्तांनाच संशय, एकनाथ शिंदेंना पत्र सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या दानपेटीतील रक्कम आणि आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळाने चौकशीची मागणी केली आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दानपेटीतील रकमेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिर ट्रस्टच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाला आणखी वेग आला तो मंदिर विश्वस्त मंडळाच्या काही […]