काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारींच्या बाबींची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची […]
विदर्भ
मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध […]
अनधिकृत बालगृहे आढळल्यास तात्काळ तक्रार करा – महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांचे आवाहन
गडचिरोली : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील बेकायदेशीर बालगृहे, वसतीगृहे व अनाथाश्रमांविषयी वृत्तपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे ठेवून त्यांच्यावर शारिरीक, मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र […]
शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश मंत्रालयात प्रदान केले. ‘मुख्यमंत्री […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
राज्यातील पात्र शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या समन्वयाने विविध शिष्यवृत्ती योजनांची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री […]
मंत्रिमंडळ निर्णय
नायगांव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक; १४२ कोटींची तरतूद मुंबई, दि. २२ : स्त्री शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे नायगाव येथील […]
१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा तीव्र आहे त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा असे निर्देश देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव […]
मिरची उत्पादन आणि कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रीमती प्रीती हिरळकर यांचे मार्गदर्शन
गडचिरोली दि, 21 एप्रिल : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आत्मा), सोनापूर-गडचिरोलीच्या प्रमुख प्रीती हिरळकर यांनी आज सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आणि प्रगतशील शेतकरी विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर प्रजातीच्या आंबा फळबागेस भेट देऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान मिरची उत्पादनातील अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, शेतकरी […]
मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा
नागरी सेवा दिनाचे २१ एप्रिल औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करणे तसेच मुख्यमंत्री महोदयांना १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या iGOT प्रणालीवर तीन महिन्यात ९ हजारावरून ५ लाख कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आलेल्या सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र टेक लर्निंग वीक – टेक वारी” हा विशेष […]