Views: 6 सिरोंचा: नगरपंचायतचे पुढकार आणि युवा मुलांच्या आरोग्याचा व फिटनेसचा विचार करून, सिरोंचा येथील जुन्या ग्रामपंचायतच्या प्रांगणात (कोत्तागुडम रोड, सिरोंचा मॉलजवळ) नवीन जिम (व्यायामशाळा) सुरू करण्यात आली आहे. या जिमसाठी शासनाकडून स्लॅब मंजूर (शॅन्सन) करण्यात आला असून, आता ही जिम नागरिकांसाठी अधिकृतपणे खुली झाली आहे. प्रशासनाच्या या आरोग्यदायी निर्णयामुळे परिसरातील युवा वर्गामध्ये कमालीचा आनंद […]
विदर्भ
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!
Views: 8 अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झालेल्या या रुग्णालयाला वर्ष पूर्ण होत आले, तरी नियमित पदे […]
गडचिरोली देशात अव्वल! नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक
Views: 11कृषी व जलसंपदा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक गडचिरोली, दि.०९ : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीतही गडचिरोलीने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे. या […]
मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Views: 10अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात; पीक नुकसानभरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी The गडविश्व मुलचेरा, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडल्याने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात […]
जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा
Views: 8मुंबई, दि. १०: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले. वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, […]
केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी
Views: 9केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि. १० :मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील 15 ठिकाणी भेटी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीकेली.दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त […]
जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणारे काळ्या यादीत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Views: 11रत्नागिरी, दि. १० (जिमाका):- रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला, शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा […]
पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्ताधारित होणार – मंत्री हसन मुश्रीफ
Views: 5मुंबई, दि. १०: पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी सर्व प्रवेश केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करून पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत
Views: 9नाशिक, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी […]
शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 13केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य मुंबई, दि. ११ – राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन […]










