प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १२ वा हप्ता वितरण करतील.
प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे का? याची खात्री करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे, असे पोर्टलवर सूचित केले होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी PMKisan eKYC करणे अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील १२ व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.
PM-KISAN योजनेबद्दल:
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२२ ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर तपासली जाऊ शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२२ च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तापसण्यासाठी इथे क्लिक करा.
तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार:
सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.
तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan [email protected] वर संपर्क करू शकता.
इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.
Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi will be inaugurating the “PM Kisan Samman Sammelan 2022” organised by MoA&FW and MoC&F, GoI on 17th October,2022 at Mela Ground, IARI Pusa, New Delhi.#PMKisan #agrigoi pic.twitter.com/O2Scn4m2fg
— Agriculture INDIA (@AgriGoI) October 14, 2022