गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी […]
Day: December 23, 2024
गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज उद्घाटन
गडचिरोली दि. 8 : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रसाद नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण
बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी […]
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद […]
‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु
चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुईझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७० वे ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान
मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन
राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांच्या कामांची उभारणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय […]