मुलचेरा येथे राशन कार्डच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन
नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा माधुरी सुधाकराव इंगोले निरीक्षण अधिकारी, मुलचेरा
मुलचेरा:
मुलचेरा तालुक्यात राशन कार्डशी संबंधित सर्व प्रमुख सेवा आता पूर्णतः ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर येथे ऑनलाईन करू शकता. त्यामुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे.
माधुरी सुधाकराव इंगोले, निरीक्षण अधिकारी, मुलचेरा यांनी सांगितले की, नवीन राशन कार्ड काढणे, राशन कार्डमध्ये नाव वाढवणे, नाव कमी करणे, राशन कार्डची दुय्यम प्रत काढणे तसेच राशन कार्ड प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवणे या सर्व सुविधा आता डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध आहेत.
राशन कार्डचे प्रकार व त्यानुसार मिळणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत —
पिवळा कार्ड (BPL) गरीब कुटुंबांसाठी अधिक लाभ देणारे आहे,
केशरी कार्ड (APL) सामान्य उत्पन्न गटासाठी आहे, तर
पांढरा कार्ड उच्च उत्पन्न गटासाठी असून त्यामध्ये मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत.
या ऑनलाईन सेवेमुळे कार्यालयीन गर्दी कमी होईल, कामकाज अधिक पारदर्शक व जलद होईल, तसेच नागरिकांना सुलभ व कार्यक्षम सेवा मिळेल, असे मत राशन अधिकारी, मुलचेरा यांनी व्यक्त केले आहे.





