गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वेलमागड पहाडीवरील तब्बल ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाने मे. ओमसाईराम स्टील्स आणि अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला या भागात खनिज सर्वेक्षणासाठी अधिकृत परवानगी दिली असून, वन विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.



