सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन!
*अहेरी:-* एटापल्ली येथील ५८ वर्षीय दिव्यांग श्री.जितेंद्रजी खन्ना यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी त्यांना चारचाकी वाहन भेट देत मदतीचा हात पुढे केला.अहेरी येथील रुक्मिणी महल येथे विशेष निमंत्रित करून राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते त्यांना वाहन प्रदान करण्यात आले.
जितेंद्रजी खन्ना यांच्या गरजा आणि दैनंदिन प्रवासातील अडचणींचा विचार करून हे वाहन देण्यात आले.यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटदेखील भेट देण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे,या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.या मदतीमुळे जितेंद्रजी खन्ना यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
दिव्यांगांच्या गरजा ओळखून त्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगता यावे,यासाठी राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे एका गरजू व्यक्तीला स्वावलंबनाच्या दिशेने नवे बळ मिळाले आहे.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.





