पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य सरसकट मदत, पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी धाराशिव, दि.२३ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. […]
ताज्या घडामोडी
*सिरोंचा येथील शासकीय आश्रम शाळेत वृक्षारोपण व आरोग्य तपासणी संपन्न*
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपक्रम; वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग सिरोंचा, २३ सप्टेंबर: येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत २२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य वृक्षारोपण आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत शाळेत विविध नाविन्यपूर्ण […]
वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा निर्णय मुंबई, दि. २२: राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी केली. तसेच त्या लवकरात लवकर शासनाच्या सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यास सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत एकूण […]
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच
लातूर, दि. २३ (जिमाका) : शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद […]
*गडचिरोलीत दत्तक प्रक्रियेची ४ प्रकरणे निकाली; चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व*
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली मंजुरी गडचिरोली, २१ सप्टेंबर : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशान्वये या चार बालकांच्या नाते अंतर्गत दत्तक प्रक्रियेला अधिकृत कायदेशीर मान्यता देण्यात […]
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेवा संकल्प’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१०२ जणांची आरोग्य तपासणी, ५० जणांचे स्वेच्छेने रक्तदान; १५ नागरिकांचा अवयवदानाचा महासंकल्प गडचिरोली, २२ सप्टेंबर:राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज भव्य आरोग्य तपासणी व स्वेच्छा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या विशेष शिबिरादरम्यान एकूण १०२ […]
*दुर्गम भागातील प्रत्येक शाळेत मूलभूत सुविधा पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची ग्वाही*
* ‘प्रोजेक्ट H₂OPE’ ला मिळाली गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला सामंजस्य करार * १३४ शासकीय शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा; २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक शासकीय शाळेत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली […]
मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे, कोकणातील पाणी आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (जिमाका): मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज […]
बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ; मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन
बीड, दि १७ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट
छत्रपती संभाजीनगर, दि. १७(जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको एन ५ भागातील अजिंक्य देवगिरी गणेश उत्सव प्रतिष्ठान या मंडळास भेट देऊन आरती केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, राजेंद्र साबळे-पाटील, किशोर शितोळे आदी मान्यवर […]










