ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*एसटी बस अपघातानंतर प्रशासन गंभीर; गडचिरोली जिल्ह्यासाठी २० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर!*

  प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ५ बसेस ताफ्यात दाखल गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आणि राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि बळकट करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २५ : गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. विशेषतः […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वीच, दुष्काळाचा ‘जीआर’ आज काढणार; शेतातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढलेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. आज, शुक्रवारी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. यानंतर ते अमरावतीच्या बेलोरा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. २५ : विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे  पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*भामरागड तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य व वनहक्कांचे प्रश्न तातडीने सोडवा!*

होडरी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामसभांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन भामरागड, २२ सप्टेंबर: भामरागड तालुक्यातील गोपनार, हालोडंडी, मोराडपार, लष्कर, होडरी तसेच परिसरातील गावांमध्ये रस्ते, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सिंचन, वनहक्क आणि ग्रामसभा सक्षमीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या गंभीर प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कालबद्ध पद्धतीने (Time-bound) ठोस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एटापल्लीतील १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह कार्यक्रम उत्साहात

एटापल्लीतील १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह कार्यक्रम उत्साहात   नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन*   एटापल्ली, दि. २४ सप्टेंबर २०२६ : नगरपंचायत एटापल्ली क्षेत्रातील सर्व १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक ०६ येथे पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लभाण तांड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी; शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

लभाण तांड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी; शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन मुलचेरा, दि. 23 सप्टेंबर 2026 : अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मौजा लभाण तांडा येथे बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी केली.   यावेळी मा. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी- मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा

मुंबई, दि.२३ : थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारावेत – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची राज्यात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी आवश्यक ऑनलाइन पोर्टलच्या सद्यस्थितीबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी आढावा घेतला. योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई, दि. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग […]