मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली […]
नागपुर
उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.
मुलचेरा -: सन 2023 मधील मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला […]
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे, शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल .- मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन मुलचेरा- नुकतेच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इमर्जिंग ट्रेंड्स NCETSTSD-2024 या विषयावर गोंडवाना […]
*Mahadbt स्कॉलरशिप पोर्टल वर येत आहे तांत्रिक अडचणी*
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात. मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार […]
मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ […]
विधानसभा कामकाज
उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. २० : विदर्भातील सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० […]
जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नागपूर, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल जागरूक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे पार पाडीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा होऊन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या माध्यमातून आपण […]
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित
पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत नागपूर, दि २० : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री […]
जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांची मृतांना श्रद्धांजली नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त […]