मुलचेरा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी संचलित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, गोमनी (ता. मुलचेरा) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक पाऊलखुणा घेऊन नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी आणि पालक […]
महाराष्ट्र
जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. […]
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी प्रशासन सज्ज ३० जूनपासून बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी प्रशासन सज्ज ३० जूनपासून बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण प्रत्येक पात्र नागरिकने मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात “मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६” प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी […]
लोकमत भूषण सन्मान २०२६ : शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा गौरव
लोकमत भूषण सन्मान २०२६ : शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा गौरव मुलचेरा लोकमत समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या ‘लोकमत भूषण सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याचे शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज […]
भूमिहीन महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ दर्जा; मंत्रिमंडळाने धोरणाला मंजुरी
भूमिहीन महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ दर्जा; मंत्रिमंडळाने धोरणाला मंजुरी महिला सक्षमीकरणाला मोठी चालना; भूमिहीन महिलांना मिळणार शेतकरी म्हणून अधिकृत ओळख, योजनांचा लाभही होणार उपलब्ध राज्यात शेतीची सर्व कामे प्रत्यक्ष करणाऱ्या, मात्र स्वतःच्या नावावर शेतीची जमीन नसलेल्या भूमिहीन महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण धोरणाला मंजुरी देण्यात आली […]
समाज कल्याण विभागाला ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ५६ कोटींची मंजुरी
समाज कल्याण विभागाला ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ५६ कोटींची मंजुरी मुलांचे-मुलींचे प्रत्येकी २५० क्षमतेचे दोन स्वतंत्र वसतिगृह उभारणार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षणाची संधी; दोन ते तीन वर्षांत पाच मजली सुसज्ज इमारती होणार उभ्या गडचिरोली, दि. २६ : दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित, दर्जेदार आणि […]
रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्ह्यातील ८२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट
रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्ह्यातील ८२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट २,३०८ लसीकरण केंद्रे, १२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज; ० ते ५ वर्षांतील प्रत्येक बालकाला पोलिओ डोस देण्याचे प्रशासनाचे आवाहन गडचिरोली, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य […]
युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न सिरोंचा : सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना […]
१ ऑगस्ट २०२६ पासून एसटी प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक
१ ऑगस्ट २०२६ पासून एसटी प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने कार्ड काढण्याचे आवाहन; डिजिटल व्यवहारांना मिळणार चालना सिरोंचा, दि. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ […]
सिरोंचात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात साजरा
सिरोंचात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात साजरा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाला भावपूर्ण अभिवादन; सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग सिरोंचा, दि. — सिरोंचा शहरात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागातून ताजियांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. “या हुसेन… […]










