पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशाला अनोखी भेट म्हणून ‘विश्वकर्मा योजनेला’ सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर 5 टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. ज्यामध्ये कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये […]
सुगम्य भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली, ३ : दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२ चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्रातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला […]
मुंबई, दि. 24 : सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने […]