मुलचेरा (दि.१३ आक्टोबर २०२६): स्थाथानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मृणालिनी ठेंगणे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून हेडकॉन्स्टेबल नितीन कुमरे, हेडकॉन्स्टेबल कल्याणी नवघरे आणि डॉ. हिराचंद वेस्कडे उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्क राहणे आणि सायबर सुरक्षेविषयी जागरूक असणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अरुण लाडे यांनी केले तर राहुल सुनके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंत गजाडीवार, प्र. ठेंगरे, सुरेश मुरमुरवार, किशोर साईनवार यांचे सहकार्य लाभले.




