*२०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा… अहेरी इस्टेटचा ऐतिहासिक ‘दसरा महोत्सव २०२६’!* अहेरी राजघराण्याची शान आणि गडचिरोलीच्या समृद्ध संस्कृतीचा महासोहळा! कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान,अहेरी यांच्या वतीने आयोजित २०० वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक दसरा (विजयादशमी) महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत आहे.राजेशाही थाट आणि पारंपरिक धार्मिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना सहर्ष निमंत्रित करत आहोत! […]
Day: October 16, 2026
खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक – सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश मराठी व इंग्रजीत दरपत्रक आवश्यक
मुंबई, दि. १७ : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांच्या संभाव्य खर्चाची पूर्वकल्पना मिळून वैद्यकीय खर्चाचे नियोजन करता येणार […]
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट
मुंबई, दि. १६ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी देवी दुर्गेची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, बंगाल क्लबच्यावतीने आयोजित दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा […]
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पाठबळ आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा राज्यपालांच्या हस्ते ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन
‘मिट्टी कॅफे’ हा सामाजिक समावेशकता आणि मानवी संवेदनशीलतेचा प्रेरणादायी उपक्रम मुंबई, दि. 17 : दिव्यांग व्यक्तींच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि सन्मान दिल्यास त्या स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यावसायिक उपक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी, करुणा आणि सेवाभाव यांची जोड दिल्यास त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी […]





