ताज्या घडामोडी विदर्भ

दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा – मंत्री दादाजी भुसे दुष्काळग्रस्त ३१० तालुक्यांतील १५ लाख २८ हजार विद्यार्थ्यांना सुमारे ९६.२७ कोटींची परीक्षा शुल्कमाफी

मुंबई, दि. २५ : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे करावे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस शालेय विभागाचे प्रधान […]

ताज्या घडामोडी विदर्भ

पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने; नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्याचे आवाहन मुंबई, दि. २५ : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत […]

ताज्या घडामोडी विदर्भ

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सातारा, दि.२५: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ४२व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविला आहे. स्व.अजित पवार यांनी नेहमीच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचारानुसार आपली वाटचाल ठेवली. शासनही त्यांच्या […]

ताज्या घडामोडी विदर्भ

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार

कराड, दि. २५ : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. या दृष्टीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक साधने आणि व्यवसायाच्या […]

गडचिरोली

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी घेतले सत्य साई मंदिरात दर्शन!

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी घेतले सत्य साई मंदिरात दर्शन!   *मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराच्या विकासकामांबाबत मंदिर समितीशी केली चर्चा!*   *आलापल्ली:-* मोद्दूमडुगु अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले.   यावेळी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे स्वागत […]

गडचिरोली

एटापल्ली येथे भगवान श्री सत्य साईबाबांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न

एटापल्ली येथे भगवान श्री सत्य साईबाबांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न *सामूहिक भजन, महाआरती आणि महाप्रसादाने दुमदुमली एटापल्ली नगरी; साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग* एटापल्ली (प्रतिनिधी) : “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” आणि “सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा” हा वैश्विक संदेश देणारे युगपुरुष भगवान श्री सत्य साईबाबा यांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा श्री सत्य […]

गडचिरोली जाहिरात

बालविवाहाला लगाम घालण्यासाठी शाळा बनणार जनजागृतीचे केंद्र; गडचिरोलीत विशेष मोहीम

बालविवाहाला लगाम घालण्यासाठी शाळा बनणार जनजागृतीचे केंद्र; गडचिरोलीत विशेष मोहीम विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत पोहोचणार बालविवाहविरोधी संदेश; निबंध, पथनाट्य, रॅली आणि सामूहिक प्रतिज्ञेद्वारे सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न गडचिरोली, दि. २४ नोव्हेंबर : मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी संसाराची जबाबदारी पडू नये, त्यांच्या स्वप्नांना लग्नाच्या बेडीत अडकवले जाऊ नये, यासाठी बालविवाहाविरोधात आता शाळांमधूनच जनजागृतीची चळवळ उभी केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या […]

ताज्या घडामोडी विदर्भ

महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई, दि. २३  : महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या […]

विदर्भ

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात समिती गठित – मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश कामाचे तास, डीएसीपी योजना आणि कल्याण निधीबाबत होणार अभ्यास

मुंबई, दि २३ : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात निर्देश दिले. त्यांच्या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती गठित केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत […]

विदर्भ

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण – मंत्री मंगल प्रभात लोढा रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ

ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा सह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू मुंबई, दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा […]