विदर्भ

एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. २३ : माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे […]

विदर्भ

विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई प्रेस क्लब येथे ‘संस्थात्मक वारसा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. २३ : विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासाच्या योजनांची फळे २०४७ पर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.   लोकभवन मुंबई येथे मागील ७५ वर्षांत विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, […]

गडचिरोली

अहेरीत काँग्रेसची वादळी इनकमिंग ; सिरोंचातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच अहेरी विधानसभा क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून,त्या पक्षाच्या शेकडो प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सिरोंचा तालुक्यातील गर्कपेठा,सिरकोंडा,पोचमपाल्ली,वियमपाल्ली,वेनालय,बामणी,मद्दीकुंठा,जनमपल्ली व इतर गावातील युवा कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय […]

ताज्या घडामोडी विदर्भ

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीवरील १०० टक्के व्याज माफ, मूळ रकमेत २० टक्क्यांपर्यंत सवलत! १५ जानेवारी २०२७ पर्यंत योजनेचा लाभ घेण्याची संधी; कायमस्वरूपी वीजजोडणी खंडित ग्राहकांना मोठा दिलासा

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीवरील १०० टक्के व्याज माफ, मूळ रकमेत २० टक्क्यांपर्यंत सवलत! १५ जानेवारी २०२७ पर्यंत योजनेचा लाभ घेण्याची संधी; कायमस्वरूपी वीजजोडणी खंडित ग्राहकांना मोठा दिलासा मुंबई : वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणने ‘अभय योजना २०२६-२७’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा […]

विदर्भ

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 22 : राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.   अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मृद व जलसंधारण आणि कृषी विभागाच्या समन्वयातून कामांचा वेग वाढविण्याचा निर्णय – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. २२ : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३० जून २०२७ पर्यंत राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याने मृद व जलसंधारण […]

विदर्भ

आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन

  Lपुणे, दि. २२ : तायक्वांदो हा केवळ पदक मिळविण्याचा खेळ नसून शारीरिक ताकदीसोबत मानसिक शिस्त, संयम, एकाग्रता, आत्मविश्वास आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर शिकवणारा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळत असून, अशा स्पर्धांना राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बालेवाडी येथील […]

विदर्भ

कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांनी करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्हासनगर येथे सीएचएम महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कौशल्याधारित शिक्षणातून जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ पुरविण्याची देशात क्षमता ठाणे, दि.२२ (जिमाका): केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून त्या पदवीसोबत उपयोजित ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे. बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित केल्यास भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे कौशल्य […]