लोकमत भूषण सन्मान २०२६ : शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा गौरव

मुलचेरा
लोकमत समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या ‘लोकमत भूषण सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याचे शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला.
नागपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विधान परिषद सदस्य दुश्यंत चतुर्वेदी, प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते श्री. गौरव बाला यांना ‘लोकमत भूषण सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. गौरव बाला हे मुलचेरा तालुक्यात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून सामाजिक, राजकीय व लोकहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविल्याची दखल घेत त्यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या सन्मानाबद्दल मुलचेरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांनी श्री. गौरव बाला यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.





