
मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या माध्यमातून वादग्रस्त वक्फ नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच, तपासणीदरम्यान बेकायदेशीर वक्फ नोंदी आढळल्यास त्या तातडीने रद्द करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वक्फ नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास तसेच संबंधित प्रकरणांचे निराकरण जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
“वादमुक्त वक्फ, सुसूत्र प्रशासन, न्याय समाज” या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
— महाराष्ट्र शासन, महसूल विभाग




