गडचिरोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ (१) अन्वये हे आदेश जारी केले असून, ते ११ ऑक्टोबर २०२६ पासून ते २३ ऑक्टोबर […]
महाराष्ट्र
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर मोठे नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर, API आणि मृत्यूसंख्येत लक्षणीय घट
*गडचिरोली 08:-* राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक (API) आणि हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये […]
*सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचा उत्कृष्ठ निर्णय: नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘सिरोंचा मॉल’ परिसरात रस्ते सफाई सुरू*
मुख्य अधिकारी (CO) आणि नगराध्यक्षांचे उत्कृष्ट नियोजन; कर्मचारी किशन भाऊ यांच्या देखरेखीखाली सफाई कामगारांकडून सुरक्षित व सुरळीत काम सिरोंचा (गडचिरोली): शहरातील रस्ते स्वच्छ आणि चकाचक असावेत या मुख्य उद्देशाने [सिरोंचा नगर पंचायत]प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे शहरात कोणतीही रोगराई पसरू नये, तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या सामाजिक […]
विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत. यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो, […]
*सिरोंचात नवरात्रोत्सवापूर्वी बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याची माजी विद्यार्थ्यांची मागणी*
मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य; भाविक, महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सिरोंचा: आगामी पावन नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सिरोंचा शहरातील बंद आणि नादुरुस्त असलेले सर्व पथदिवे (Street Lights) तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी धर्मराव विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सणासुदीच्या काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सार्वजनिक […]
*आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गडचिरोलीत ६१ वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी*
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण उपक्रम; मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना औषधे व फळांचे वाटप गडचिरोली, १ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकूण ६१ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मातोश्री वृद्धाश्रम आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर सर्व […]
*गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये ३३.५६ टक्के घट; तरीही एकूण अपघात वाढल्याने जिल्हाधिकारी गंभीर*
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा; रस्तेदुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश गडचिरोली, ३० सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी अपघातांची वाढती एकूण संख्या आणि दुचाकीस्वारांचे होणारे मृत्यू लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी […]
पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; ग्रामपातळीवरील प्रश्नांसाठी ‘प्रतिसरपंच’ उपक्रम
पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; ग्रामपातळीवरील प्रश्नांसाठी ‘प्रतिसरपंच’ उपक्रम गडचिरोली : आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि ग्रामपातळीवरील जनतेच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर […]
NCMC कार्ड तपासून सवलतीचे तिकीट रोखीने द्यावे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी; प्रभाकर कुबडे यांचे आवाहन
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी; प्रभाकर कुबडे यांचे आवाहन गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला लाभार्थ्यांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सवलतीचे तिकीट मिळण्यासाठी NCMC कार्डमध्ये रक्कम उपलब्ध असणे बंधनकारक करण्याची अट ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी जाचक ठरत असल्याचे […]
‘नो मॅपिंग’ व ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही; बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे घेणार
व्हॉट्सॲपद्वारेही पुरावे सादर करण्याची सुविधा मुंबई, दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ असलेल्या आणि सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. तसेच, संबंधित […]










