चारा-पाणी उपलब्धता, कर्जवसुली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवरही भर मुंबई, दि. १:- राज्य शासनाने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर १ तालुक्याव्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास करण्यात आली आहे. या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना मंगळवारी […]
महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित माछर यांचे कौतुक महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित, भारताचा सार्थ अभिमान
मुंबई, दि. १: स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही फ्लाय दुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी प्रसंगावधान राखून धीरोदात्तपणे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. या असाधारण आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या धैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकर कॅप्टन स्मित यांचा खरा हिरो असा उल्लेख करत, त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित तमाम भारतीयांसाठी सार्थ […]
भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा तंत्रज्ञानाचा लाभ अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. १ : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आदी भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा व तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी कुलगुरूंशी बोलताना व्यक्त केली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंच्या ‘भविष्यवेधी तंत्रज्ञान’ गटाची (Futuristic Technology Forum) बैठक आज लोकभवन मुंबई येथे संपन्न […]
बाल्यावस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक क्षेत्रातील वॉर रूम बैठकीत बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासाचा आढावा; संयुक्त मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश
मुंबई, दि. १ : बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी माता आणि बालक यांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीने काम करावे. त्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’ तयार करावे आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा. या मिशनसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन करून त्यामार्फत नियमितपणे डेटाआधारित देखरेख केली जावी, असे […]
श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग मुलचेरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने जलसंधारण व मृदसंधारणाच्या उद्देशाने मौजा गणेशनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या उपक्रमामागील […]
बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर येणार ४० हजार गावांतील गणेशकथा
मुंबई, दि. २९ : सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’च्या ट्रेलरचा शुभारंभ
मुंबई, दि. २९ : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेते राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २६/११च्या घटनेनंतर दहशतवादाविरोधात […]
पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पुणे ग्रोथ हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण
१५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट मेट्रोचे जाळे २५० किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन २०३६ पर्यंत ९० टक्के पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य मुंबई, दि. २८ : नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे आर्थिक प्रदेशाची […]
आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. २८ : आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘आयुर्वेद दिन २०२६’ निमित्त एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवादाचे आयोजन […]
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासकीय क्षमता वाढवून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शासन यंत्रणेची क्षमता बळकट करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि योजनांच्या परिणामांचे प्रभावी मूल्यमापन यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांतून महाराष्ट्र विकसित राज्य म्हणून देशासाठी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सह्याद्री […]










