गडचिरोली, : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतीशाळेचा पहिला वर्ग १० जुलै रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला. नैसर्गिक शेतीचा प्रसार, हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि खरीप हंगामाचे योग्य नियोजन याबाबत महिला शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्काची […]
Author: Lokrath Team
पावसाळ्यात जंगलात रानभाज्यांची रेलचेल; पौष्टिकतेसोबत ग्रामीण भागाला रोजगाराचाही आधार
पावसाळा सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यातील जंगल, डोंगराळ आणि दुर्गम भाग विविध प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्यांनी बहरून जात आहेत. निसर्गाच्या कुशीत कोणत्याही रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टिक, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतात. याचबरोबर त्यांच्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांना हंगामी उत्पन्नाचाही आधार मिळत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच अनुभवी आणि जाणकार […]
IRCTC कडून प्रवाशांना मोठा दिलासा; ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी नवी वेबसाइट १५ जुलैपर्यंत बीटा स्वरूपात येण्याची शक्यता
भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून, प्रवाशांना अधिक वेगवान, सोपी आणि जाहिरातमुक्त सेवा देण्यासाठी IRCTC लवकरच आपल्या नव्या वेबसाइटचे सार्वजनिक बीटा व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. नवीन वेबसाइटमुळे तिकीट बुकिंगदरम्यान येणारा स्लो इंटरफेस, सतत दिसणाऱ्या जाहिराती, गुंतागुंतीचा कॅप्चा आणि तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात […]
राज्यात नर्सिंग शिक्षणाचा मोठा विस्तार; १० नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी, गडचिरोलीसह १० जिल्ह्यांना मोठी संधी
राज्यातील आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नर्सिंग शिक्षण क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात १० नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास तसेच ८ विद्यमान शासकीय जीएनएम (General Nursing and Midwifery) महाविद्यालयांचे बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील […]
एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या; स्पर्धा परीक्षांतील बदलांविरोधात लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य लक्षवेधी महामोर्चा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी लातूर शहरात भव्य लक्षवेधी महामोर्चा काढण्यात आला. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि भरती प्रक्रियेत विश्वासार्हता कायम ठेवण्याच्या मागण्यांसाठी हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सुरू झालेला महामोर्चा […]
महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे ‘छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ’ विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
आरमोरी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे ‘छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ’ या विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, विद्यार्थ्यांचे हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा […]
गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा
गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा तरुण पिढीने छोटे व सुदृढ कुटुंब अंगीकारावे : अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके नर्सिंग प्रशिक्षणार्थींच्या रांगोळीतून वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र; कुटुंब नियोजन व लोकसंख्या लाभांशावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन गडचिरोली | प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या समन्वयाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्य […]
सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा
सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा | लोकरथ न्यूज | सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वसलेले वडदाम जीवाश्म उद्यान (Waddham Fossil Park) हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोर, प्राचीन मासे, वृक्ष आणि इतर सजीवांच्या जीवाश्मांचा अनमोल […]
अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट
अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणावर सविस्तर चर्चा. गडचिरोली:- भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, […]
महिला व बाल रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडून उच्चस्तरीय प्रत्यक्ष पाहणी
प्रसूती झालेल्या माता, रुग्णांचे नातेवाईक आणि आशा स्वयंसेविकांशी साधला थेट संवाद गडचिरोली, दि. १० जुलै (जिमाका) : राज्यातील आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, रुग्णाभिमुख आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मा. संजय काटकर यांनी काल गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन विविध आरोग्य […]










