गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

आरोग्य सेवेचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावू – आयुक्त संजय काटकर गडचिरोली दौऱ्यात आरोग्य सेवांचा उच्चस्तरीय आढावा

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत कुरुड येथे वृक्षारोपण; आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक गडचिरोली, दि. १० (जिमाका) : जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी दिली. श्री. काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

गंजीरामन्नापेठा येथील जि.प. शाळा पूर्ववत सुरू करण्याची पालकांची जोरदार मागणी; तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

पटसंख्येअभावी शाळा बंद झाल्याने १४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; चार किलोमीटर अंतरावरील शाळेत जाणे धोकादायक असल्याने पालक संतप्त सिरोंचा | प्रतिनिधी सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नडीकुडा केंद्रातील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागील वर्षापासून पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने बंद केल्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर गंभीर शैक्षणिक संकट निर्माण झाले आहे. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले असून […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जमाफीतील ‘५० हजारांची अट’ रद्द; आता २ लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई, दि. १० : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, आता अशा पात्र शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न ६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड

*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न* *६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड* गडचिरोली, दि. १० (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा शुक्रवार, दि. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर – उपवनसंरक्षक दिपाली तलमले गडचिरोली, दि. १० जुलै (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र हरित अभियान २०२६’ अंतर्गत वन विभागाच्या आल्लापल्ली वनविभागातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तसेच त्यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली, दि. १० : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी तिघांना डांबून ठेवले होते, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आहे. दि. ९ जुलै रोजी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

वैशाली मेकओवर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचा तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सिरोंचा : वैशाली मेकओवर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी यांच्या तृतीय बॅचच्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात अकॅडमीतून मेकअप व ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार, श्रीजा भंडारी (शिक्षिका) […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंचा नगरपंचायतीकडून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन; १५ लाखांच्या खासदार निधीतून साकार होणार ज्ञानमंदिर

सिरोंचा | सिरोंचा शहरातील नागरिकांना दर्जेदार वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपंचायत सिरोंचा यांच्या पुढाकारातून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. बुधवार, दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पदमा सतीश भोगे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन, नारळ अर्पण व फित कापून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चातगाव आरोग्य उपकेंद्राला मध्यरात्री अचानक भेट

रात्रीच्या आरोग्य सेवेची तत्परता, औषधसाठा, मलेरिया निदान किट्स व नोंदींची केली प्रत्यक्ष पडताळणी गडचिरोली, : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बुधवारी मध्यरात्री गडचिरोलीजवळील चातगाव आरोग्य उपकेंद्राला कोणतीही पूर्वसूचना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

युरिया व डीएपी खतटंचाईविरोधात अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ‘हल्लाबोल’ आंदोलन

अहेरी, दि. ९ : खरीप हंगाम २०२६–२७ मध्ये शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अहेरी येथे सोमवारी दुपारी १२.०० वाजता ‘हल्लाबोल’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सीनेट सदस्या […]