*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे बिस्किटे व फळांचे वाटप.!*
*मुलचेरा:- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मुलचेरा येथे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना,आधार केंद्रात येणाऱ्या नागरिकांना,शालेय विद्यार्थ्यांना, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले.
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच नागरिक,कर्मचारी आणि रुग्णांप्रती आपुलकी व्यक्त करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जनसेवा हीच खरी सेवा,या भावनेतून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे,बालू बुरामवार,अक्षय गावडे, किशोर नरोटे,दशरथ कन्नाके,अक्षय कुळमेथे राकेश नरोटे,हे उपस्थित होते.





