ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पोकरा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ — तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांची माहिती

पोकरा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ — तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांची माहिती

मुलचेरा

पोकरा (PoCRA – Climate Resilient Agriculture) योजनेअंतर्गत मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आर्थिक व तांत्रिक लाभ मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे. योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन, मृद व जलसंधारण, पीक विविधीकरण, सेंद्रिय शेती, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी अनुदान दिले जाणार आहे.

विकास पाटील यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पीक उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यासाठी पोकरा योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”

तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच योजनेविषयी मार्गदर्शनासाठी ग्रामस्तरावर जनजागृती शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेमुळे मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.