गडचिरोली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलचेरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलचेरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी,मुलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या सामाजिक उपक्रमाला मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील सर तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी पठाण सर यांनी सुद्धा रक्तदान केले. तसेच कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अनेक युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोत्तम दान असून,अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळते,असे सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्त्ता,भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,जिल्हा सचिव सुभाष गणपती,युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, बंगाली आघाडी अध्यक्ष मोंटू सरकार,जिल्हा सरचिटणीस बिधान बैद्य,उत्तम शर्मा, इंदरशाह पेंदाम,किशोर नेवारे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.