मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश गडचिरोली, दि. २८ (जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट तसेच ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वैनगंगा, […]
ताज्या घडामोडी
आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार भारत सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. गुडघेदुखी, विविध […]
शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय
शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मुंबई, दि. २४ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेत व पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यातील वन व वृक्षाच्छादन वाढविणे तसेच सन २०२६–२०२७ मधील “३०० कोटी वृक्षारोपण अभियान” प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने […]
मलेरियाबाधित विद्यार्थिनीवर राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत उपचार व संदर्भन : जिल्हा आरोग्य अधिकारी
गडचिरोली, दि. २४ : कोरची तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथे शिक्षण घेत असलेल्या संजना बिरसिंग जाळे (वय १५ वर्षे, रा. ग्यारापट्टी, ता. कोरची) हिच्या उपचारासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सविस्तर घटनाक्रम स्पष्ट केला असून, उपलब्ध माहितीनुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मलेरिया उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत उपचार, नियमित देखरेख आणि योग्य वेळी […]
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी सखींसाठी २४ जुलै रोजी एकदिवसीय वेबिनार
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी सखींसाठी २४ जुलै रोजी एकदिवसीय वेबिनार कर्तव्य, जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन गडचिरोली, (जिमाका) : प्रकल्प संचालक, आत्मा (ATMA), गडचिरोली यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान २०२५-२६ व २०२६-२७ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या कृषी सखींसाठी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता एकदिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन […]
राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात गडचिरोलीची उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन
दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल; आता राष्ट्रीय मानांकनाकडे वाटचाल गडचिरोली, दि. २२ (जिमाका): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण […]
समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ* *आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*
अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान […]
कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी नोंदणी करावी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा आढावा गडचिरोली, दि. २२ जुलै (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा […]
मुलचेरा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?
वाहनचालक आणि नागरिकांचा संताप; तातडीने दुरुस्तीची मागणी मुलचेरा, दि. २१ : मुलचेरा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत असून, पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. […]
डीएपीच्या पर्यायांचा वापर करावा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन जिल्ह्यात ९०६ मेट्रिक टन डीएपीचा पुरवठा; लवकरच आणखी १,२०० मेट्रिक टन उपलब्ध होणार
गडचिरोली, दि. २१ : डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत संरक्षित साठ्यासह ९०६ मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा करण्यात आला […]










