गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घरफोडी व जबरी चोरीच्या 02 विविध गुन्ह्रांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन दागिणे फिर्यादींना सुपुर्द

पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे हस्ते एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सुपूर्द

सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्रांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करण्यात येऊन सदर गुन्ह्रातील मुद्देमालाचा शोध पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून घेण्यात आला आहे. पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने मालमत्तेविरुद्धच्या दोन गंभीर चोरीच्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर मुद्देमाल आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला आहे.

        दिनांक 27.04.2026 रोजी रामनगर, गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिला या त्यांच्या नातेवाईकांकडे एसटी बसने जात असताना प्रवासादरम्यान अज्ञात चोरट¬ांनी त्यांचेकडील 58.5 ग्रॅम वजनाचे व रू 8,62,500/- किंमतीचे सोने चोरल्याची घटना घडली होती. यावरुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप. क्र. 518/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्रात गोपनिय माहितीच्या आधारे उत्कृष्ट तपास करुन पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येऊन चोरीस गेलेले एकूण 58.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत रु. 8,62,500/- मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आले होते.

तसेच दिनांक 16/03/2026 रोजी गुन्ह्यात फिर्यादी यांच्या मौजा आमिर्झा येथील सोने-चांदीच्या दुकानात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश करुन चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात सोन्या-चांदीचे विविध दागिने असा एकूण रु. 2,33,500/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे अप. क्र. 254/2026, भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्रात देखील पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे विविध दागिने असा एकूण रु. 2,33,500/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

सदर तपासादरम्यान एकूण 06 आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्रातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यानंतर मा. न्यायालायाकडून सदरचे जप्त मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करणेबाबत आदेश प्राप्त झालेले होते. त्या अनुषंगाने आज रोजी फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे बोलविण्यात येऊन एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या हस्ते फिर्यांदी यांना सुपूर्द करण्यात आला. चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने पुन्हा आपल्या हाती मिळाल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त करून गडचिरोली पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल आभार व्यक्त केले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि. कृष्णा सोनुले, पोउपनि. अतुल तराळे व अंमलदार यांनी पार पाडली.

G K