सिरोंचा:-“ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेचे ऋण समाजाप्रती सेवा करून फेडूया,” या उदात्त भावनेतून राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथील सन २०००–२००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना […]
ताज्या घडामोडी
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराला यश; गडचिरोलीतील ६२ बालकांवर मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया
गडचिरोलीत ३४६ बालकांच्या तपासणीनंतर ६२ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र; प्रवास, निवास, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च मोफत गडचिरोली, दि. ८ जुलै (जिमाका) : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त बालकांसाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर […]
परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य
परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य वाहनचालक परवान्यासाठी नवीन नियमावली; महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्रात वाहनचालक परवाना (Driving Licence) मिळविण्याच्या प्रक्रियेत राज्य शासनाने महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०२६ पासून वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी महाराष्ट्र अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन […]
पेंढरी रोडवर अनियंत्रित कारने मारली पलटी 2 जखमी
धानोरा गडचिरोली वरुन निघालेली कार पेंढारी गावाजवळ वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पडलटून झालेल्या अपघातात 2 गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक 6जुलै 2026 ला सकाळी 10.00च्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कोआँपरेटिव्ह बँक शाखा पेंढरी येथील कर्मचारी गडचिरोली येथे राहतात.दररोज कारने पेंढरी येथे येजा करतात पण काल दिनांक 6 जुलैला कोआँपरेटिव्ह बँकेचे चार […]
संघर्षातून उभा राहिलेला यशस्वी युवा उद्योजक – किरण पेंटर
सिरोंचा शहरात आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे किरण भाऊ पेंटर आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण भाऊंनी लहान वयातच घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्षमय प्रवास सुरू केला. शिकण्याची प्रचंड आवड असतानाही परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासोबत कामाची वाट निवडावी लागली. पेंटिंगचे काम शिकण्यासाठी ते आलापल्ली […]
डिजिटल कृषी सेवेचा नवा अध्याय! शेतकऱ्यांशी थेट संवादासाठी मुलचेरा कृषी विभागाचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, अनुदान, शासकीय योजना आणि तांत्रिक मार्गदर्शन आता थेट मोबाईलवर; क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणांत चॅनेलशी जोडा
मुलचेरा, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती वेळेवर, विश्वासार्ह आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डिजिटल कृषी सेवेचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. कृषी विभागाचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, रोग व किडींचे नियंत्रण, अनुदान, […]
रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून नगरसेवक आक्रमक; सिरोंच्यात तातडीच्या दुरुस्तीची मागणी
सिरोंचा : सिरोंचा शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या प्रमुख मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्याने नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार आणि इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेत रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या विकासासाठी […]
भाजप पदाधिकाऱ्यांकडून अहेरीच्या नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हेमंत चांदेवार यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेसाठी शुभेच्छांचा वर्षाव
अहेरी,: अहेरी उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) श्री. हेमंत चांदेवार यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अहेरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अहेरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन उल्लेखनीय कार्य करेल, […]
अहेरी महिला व बाल रुग्णालयाच्या समस्यांची आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल; विशेष पथक अहेरीत दाखल
अहेरी, प्रतिनिधी :अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे आणि विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवेच्या प्रश्नाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानंतर अवघ्या काही तासांत आरोग्य विभागाचे विशेष पथक अहेरी येथे दाखल झाले असून, रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील विधानभवनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष […]










