मुख्य अधिकारी (CO) आणि नगराध्यक्षांचे उत्कृष्ट नियोजन; कर्मचारी किशन भाऊ यांच्या देखरेखीखाली सफाई कामगारांकडून सुरक्षित व सुरळीत काम
सिरोंचा (गडचिरोली):
शहरातील रस्ते स्वच्छ आणि चकाचक असावेत या मुख्य उद्देशाने [सिरोंचा नगर पंचायत]प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे शहरात कोणतीही रोगराई पसरू नये, तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या सामाजिक जाणिवेतून प्रशासनाने विशेष रस्ते सफाई मोहीम हाती घेतली आहे. सध्या शहरातील गजबजलेल्या ‘सिरोंचा मॉल’ परिसरात ही व्यापक सफाई सुरू आहे.प्रदूषण आणि रोगराई रोखण्यासाठी उपाययोजना
सध्या वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन जनतेचा आणि त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करून ही मोहीम आखण्यात आली आहे. यामुळे परिसरात पसरणारे प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुख्य अधिकारी (CO) व नगराध्यक्षांचे उत्कृष्ट नियोजन
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सिरोंचा नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी (CO) आणि नगराध्यक्ष यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले आहे. जनतेच्या हिताचा विचार करून त्यांनी तातडीने या कामाला सुरळीत चालवू असे ठरवलीये.त्यांच्या या तत्परतेमुळेच शहरात स्वच्छतेचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.
कर्मचारी किशन भाऊ यांच्या देखरेखीखाली कामगार कार्यरत
यावर प्रत्यक्ष नियोजन चोख ठेवण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी किशन भाऊ यांच्या थेट देखरेखीखाली सर्व सफाई कामगारांना या कामावर लावण्यात आले आहे. सफाईचे काम करत असताना कुठेही अडथळा निर्माण होणार नाही आणि कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, याची काळजी घेतली जात आहे. किशन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुरक्षित आणि सुरळीतपणे हे काम पूर्ण केले जात आहे.





