ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोखंडी मंडप कोसळून चिमुकल्यासह वृद्ध गंभीर जखमी

अहिल्यानगर शहरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाईपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिराजवळ रस्त्यावर उभारण्यात आलेला लोखंडी मंडप अचानक कोसळल्याने दुर्घटना घडली. या घटनेत एका लहान मुलासह वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, दोघांवरही परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील १,०५८ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पट पडताळणी आदिवासी विकास विभागाची राज्यव्यापी विशेष मोहीम यशस्वी

मुंबई, दि. ९ : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यातील शासकीय व अनुदानित अशा एकूण १,०५८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची अचूकता तपासण्यासाठी एकाच दिवशी विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित आश्रमशाळांचा समावेश होता. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय अभिलेखांतील नोंदी यांची पडताळणी करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत या मोहिमेचे नियोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ९ :  मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी आधुनिक पोषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील सागरी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील नेक्सजेन फीड्स या अत्याधुनिक उत्पादन व अॅक्वाकल्चर सोल्युशन्स केंद्राला भेट दिली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स

स्मृतीदोष क्लिनिकमधून दरवर्षी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तूचे वैशिष्ट्य जपावे – सभापती प्रा. राम शिंदे सुसज्ज ‘मनोरा आमदार निवास’ची नूतन वास्तू फेब्रुवारी, २०२८ पूर्वी सेवेत

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी महाराष्ट्र विधानमंडळानजीकच्या नूतन मनोरा आमदार निवासाच्या सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर असून ‘अ’ आणि ‘ब’ असे इमारतीचे दोन्ही मनोरे सर्व सुसज्ज सोयी सुविधांसह फेब्रुवारी, 2028 पूर्वी आमदारांच्या सेवेत येणार आहेत. ‘अ’ मनोऱ्याचे सर्व 29 मजले बांधून पूर्ण झाले असून ‘ब’ मनोऱ्याचे 42 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

मुंबई, दि. ९ : पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर उमटलेले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकभवन येथे पोलीस पदक अलंकरण समारोह राज्यपालांच्या हस्ते १०३ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

मुंबई, दि. ०९ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये १०३ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ व २०२३ या वर्षांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच २०२३ व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पाच दशकांचा वनवास संपला; हनुमाननगर, चंद्रनगरच्या सूर्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मालकी हक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासन निर्णय ग्रामस्थांच्या स्वाधीन; तीन महिन्यांत प्रत्येक लाभार्थ्याला सातबारा

“स्थानिकांना सोबत घेऊन पालघर जिल्हा राज्यातील पहिल्या पाच विकसित जिल्ह्यांमध्ये आणणार”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    पालघर ९ ऑक्टोबर : सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणासाठी विस्थापित होऊन पालघर तालुक्यातील हनुमाननगर आणि चंद्रनगर येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांचा तीन पिढ्यांचा संघर्ष आज संपला. या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांच्या स्वाधीन केली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एटापल्ली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; CPI, किसान सभेची मागणी

एटापल्ली,  : एटापल्ली तालुक्यात यावर्षी अनियमित पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, पीक रोगराई व कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होत असून तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महासारथी महाआयडीद्वारे शासकीय सेवा एका क्लिकवर; नागरिकांना एकात्मिक डिजिटल सुविधांचा लाभ

महाराष्ट्र शासनाच्या महासारथी उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एक नागरिक, एक महाआयडी’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. महासारथी महाआयडीच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, पात्रता तपासणी आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. काय आहे महासारथी महाआयडी? […]