ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी; प्रभाकर कुबडे यांचे आवाहन गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला लाभार्थ्यांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सवलतीचे तिकीट मिळण्यासाठी NCMC कार्डमध्ये रक्कम उपलब्ध असणे बंधनकारक करण्याची अट ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी जाचक ठरत असल्याचे […]
ताज्या घडामोडी
‘नो मॅपिंग’ व ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही; बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे घेणार
व्हॉट्सॲपद्वारेही पुरावे सादर करण्याची सुविधा मुंबई, दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ असलेल्या आणि सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. तसेच, संबंधित […]
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा
चारा-पाणी उपलब्धता, कर्जवसुली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवरही भर मुंबई, दि. १:- राज्य शासनाने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर १ तालुक्याव्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास करण्यात आली आहे. या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना मंगळवारी […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित माछर यांचे कौतुक महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित, भारताचा सार्थ अभिमान
मुंबई, दि. १: स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही फ्लाय दुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी प्रसंगावधान राखून धीरोदात्तपणे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. या असाधारण आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या धैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकर कॅप्टन स्मित यांचा खरा हिरो असा उल्लेख करत, त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित तमाम भारतीयांसाठी सार्थ […]
भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा तंत्रज्ञानाचा लाभ अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. १ : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आदी भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा व तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी कुलगुरूंशी बोलताना व्यक्त केली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंच्या ‘भविष्यवेधी तंत्रज्ञान’ गटाची (Futuristic Technology Forum) बैठक आज लोकभवन मुंबई येथे संपन्न […]
बाल्यावस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक क्षेत्रातील वॉर रूम बैठकीत बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासाचा आढावा; संयुक्त मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश
मुंबई, दि. १ : बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी माता आणि बालक यांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीने काम करावे. त्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’ तयार करावे आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा. या मिशनसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन करून त्यामार्फत नियमितपणे डेटाआधारित देखरेख केली जावी, असे […]
श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रमदानातून गणेशनगर येथे वनराई बंधारा जलसंधारणासाठी कृषी विभागाचा पुढाकार; अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग मुलचेरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने जलसंधारण व मृदसंधारणाच्या उद्देशाने मौजा गणेशनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या उपक्रमामागील […]
बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर येणार ४० हजार गावांतील गणेशकथा
मुंबई, दि. २९ : सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’च्या ट्रेलरचा शुभारंभ
मुंबई, दि. २९ : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेते राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २६/११च्या घटनेनंतर दहशतवादाविरोधात […]
गडचिरोली : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात ६ तस्कर अडकले, वाघांच्या अवयवासह २ खवले मांजर जप्त
गडचिरोली : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात ६ तस्कर अडकले; वाघांच्या अवयवासह २ खवले मांजर जप्त आलापल्ली : वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री रचलेल्या विशेष सापळ्यात सहा तस्करांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वाघाचे ४२ हाडे, दोन दात आणि दोन जिवंत खवले मांजर जप्त […]










