मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार […]
Month: October 2026
आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग* महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या; प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलावले
अहेरी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. दोन दिवसांत पदभरतीसह आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने हालचालींना वेग दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, […]
*सिरोंचात पारंपरिक ‘बथुकम्मा’चा जल्लोष; १३ ऑक्टोबरला रंगणार भव्य सांस्कृतिक सोहळा, सुप्रसिद्ध गायिका निर्मला राठोड यांची मुख्य उपस्थिती*
सिरोंचा प्रतिनिधी: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये सध्या पारंपरिक बथुकम्मा उत्सवाचा मोठा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक जयस्तंभ मैदान, सिरोंचा येथे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण तेलंगणातील ख्यातनाम आणि अत्यंत लोकप्रिय लोकगायिका निर्मला राठोड यांच्या सुमधुर गायनाचा […]
*सिरोंचात पारंपारिक ‘बथुकम्मा’ महोत्सवाची धूम; १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध गायिका मधुप्रीया यांच्या सुश्राव्य गीतांची मेजवानी*
सिरोंचा: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपारिक ‘बथुकम्मा’ (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये या सवाबाबत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यांचे दर्शन […]
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष मुलाखत खादी व ग्रामोद्योगातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – साठे
मुंबई, दि. 2 : ग्रामीण भागातील स्थानिक कौशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या […]
मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्वपूर्ण ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ११ : मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत ब्लूमबर्गचे माईक […]
*सिरोंचात सुसज्ज जिमचे लोकार्पण; क्रीडाप्रेमी व युवा वर्गात आनंदाचे वातावरण*
सिरोंचा: नगरपंचायतचे पुढकार आणि युवा मुलांच्या आरोग्याचा व फिटनेसचा विचार करून, सिरोंचा येथील जुन्या ग्रामपंचायतच्या प्रांगणात (कोत्तागुडम रोड, सिरोंचा मॉलजवळ) नवीन जिम (व्यायामशाळा) सुरू करण्यात आली आहे. या जिमसाठी शासनाकडून स्लॅब मंजूर (शॅन्सन) करण्यात आला असून, आता ही जिम नागरिकांसाठी अधिकृतपणे खुली झाली आहे. प्रशासनाच्या या आरोग्यदायी निर्णयामुळे परिसरातील युवा वर्गामध्ये कमालीचा आनंद पाहायला […]
मुलचेरा तालुक्यात श्री श्री सार्वजनिक दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी; २० वर्षांहून अधिक काळाची परंपरा कायम!
मुलचेरा : तालुक्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली दुर्गा उत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात कायम ठेवण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामातेच्या आगमनाची भाविकांमध्ये उत्सुकता असून, […]
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!
अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झालेल्या या रुग्णालयाला वर्ष पूर्ण होत आले, तरी नियमित पदे पूर्णपणे […]









