ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज उद्घाटन

गडचिरोली दि. 8 : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात येणार आहे.

 वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रसाद नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी कळविले आहे.