राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत याच धर्तीवर थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं हा यलो अलर्ट लागू राहणार असून, उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येणार आहे.
त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या भागांवर धुक्याची चादर पसरणार आहे.