ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचा येथील शासकीय आश्रम शाळेत वृक्षारोपण व आरोग्य तपासणी संपन्न*

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपक्रम; वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरोंचा, २३ सप्टेंबर:
येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत २२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य वृक्षारोपण आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागरूकतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, हरित परिसर निर्मिती आणि वृक्षसंगोपनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
वैद्यकीय पथकाद्वारे आरोग्य तपासणी
कार्यक्रमादरम्यान आरोग्य विभागाच्या विशेष पथकाद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी सिरोंचा येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रमुख भूमिकेत उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने रुपा भट्टीवार (C.H.O., सिरोंचा), सुमय्या हाफीज (C.H.O., सिरोंचा), सुरेश धाकुड (C.H.O., सिरोंचा) तसेच नेत्रचिकित्सा विभागाचे राहुल डेंगळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांची तपासणी केली.
शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य
हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. ए. शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी-बंधूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विशेष परिश्रम घेतले. या संयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि वैयक्तिक आरोग्याविषयी एक सकारात्मक संदेश गेला असून, पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

G K