मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]
Day: September 16, 2026
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीकरिता गतीने नियोजन करणार- मंत्री जयकुमार रावल प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीला नवी दिशा; रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार
मुंबई, दि. १५ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्प राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारव्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी […]
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १५ : राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येईल. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आयोजित संमेलनातून लवकरच करण्यात येणार आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा तसेच कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. मंत्रालयात जलसंपदा […]
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर ४ हजार २५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता
प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम कोल्हापूर, नांदेड, नागपूर, लातूर आणि पुणे येथे मोठ्या रुग्णालयांची उभारणी व विस्तार मुंबई, दि. १५ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘प्रगती’ (प्रगती हेल्थकेअर रिइमॅजिन्ड विथ ॲडव्हान्स्ड गव्हर्नन्स अँड ॲक्सेसीबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन) या सर्वसमावेशक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. […]
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्तेयोजनेअंतर्गत ‘शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ अभियान मुंबई, दि. १५ : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित आणि सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्तेयोजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ […]




