ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*लेखणीसोबतच जपली सामाजिक बांधीलकी! सिरोंचा पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांचे जीवनदायी रक्तदान*

सिरोंचा:

पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे, तर संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे देखील आहे, याचा प्रत्यय सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी आणून दिला आहे. एका अत्यंत गरजू महिलेसाठी स्वतः देवदूतासारखे धावून जात त्यांनी तातडीने रक्तदान केले आणि ‘मानवतेचा धर्म’ सर्वोपरी असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
वेळेची पर्वा न करता गाठले रुग्णालय:
मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील एका महिलेची प्रकृती अचानक खालावली होती. शरीरातील रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने डॉक्टरांनी तातडीने रक्त पुरवण्याची गरज व्यक्त केली होती. चिंतेत असलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी मोठ्या आशेने पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याचे लक्षात येताच, मूलकला यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून क्षणाचाही विलंब न करता थेट शेजारच्या तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील रुग्णालय गाठले आणि स्वतः रक्तदान करून त्या माऊलीला जीवनदान दिले.
केवळ लेखणीतून नव्हे, तर कृतीतून दिली प्रेरणा:
आजच्या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या कामात व्यस्त आहे, तिथे सागर मूलकला यांनी दाखवलेले हे सेवाभावी रूप समाजाला एक नवी दिशा देणारे आहे. त्यांची ही तत्परता सिद्ध करते की, पत्रकारितेची खरी ताकद केवळ शब्दांत नसून समाजाच्या सुख-दुःखात थेट सहभागी होण्यात आहे.
सागर मूलकला यांच्या या संवेदनशील आणि जीवनदायी पाऊलामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन परिसरातील इतर नागरिक आणि युवकांमध्येही रक्तदानाविषयी एक नवी जनजागृती निर्माण होत आहे.
“रक्तदान हेच जीवनदान… एक पाऊल मानवतेकडे!”

G K