ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

भारत सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे.

या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. गुडघेदुखी, विविध गंभीर आजार तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी या योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी संदेश देण्यात आला आहे – “बूढ़ा हूं तो क्या हुआ, अब भी डांस कर सकता हूं!” तसेच, “आयुष्मान वय वंदना कार्ड से आज, घुटनों का दर्द और खर्च की चिंता मिटा चुका हूं।”

महत्त्वाची सूचना : आयुष्मान वय वंदना कार्ड केवळ 70 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या कार्डद्वारे दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

हेल्पलाईन : 1800-1800-4444 अधिक माहितीसाठी : https://www.ayushmanup.in/