भारतीय संघाच्या मोहिमेची सुऊवात वेस्ट इंडिजविऊद्धच्या सामन्याने
वृत्तसंस्था, दुबई : भारत आपल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक विजेतेपदाच्या बचावाची सुऊवात 22 जानेवारी रोजी काठमांडू येथे वेस्ट इंडिजविऊद्ध करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत बांगलादेश आणि नेपाळमध्ये खेळवली जाईल.
स्पर्धेच्या या तिसऱ्या आवृत्तीत प्रत्येकी चार संघांचे चार गट असतील आणि सामने चट्टोग्राम, सिलहट आणि काठमांडू येथील मैदानांवर खेळवले जातील. दोन वेळा विजेतेपद पटकावलेला भारत सहयजमान नेपाळ, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडसोबत ‘गट अ’मध्ये आहे. स्पर्धेची सुऊवात 21 जानेवारी रोजी सहयजमान बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामन्याने होईल. त्याचदिवशी सिलहट येथे मागील आवृत्तीतील उपविजेता ऑस्ट्रेलियाचा सामना नायजेरियाशी होईल.
काठमांडू येथील अप्पर मुलपानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंका आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होईल, त्यानंतर इंग्लंड आणि अमेरिका आमनेसामने येतील. नेपाळ आपल्या मोहिमेची सुऊवात 22 जानेवारी रोजी आयर्लंडविऊद्ध करेल. त्याच दिवशी चट्टोग्राममध्ये न्यूझीलंडचा सामना सामोआशी, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानशी होईल. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता म्हणाले की, 19 वर्षांखालील विश्वचषक हे असे व्यासपीठ आहे जे आपल्या खेळाचे भविष्य दर्शवते. तऊण खेळाडूंसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत उच्चस्तरीय कारकिर्दीकडे वाटचाल करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.
गट फेरी 26 जानेवारीपर्यंत चालेल, त्यानंतर पात्र ठरलेले संघ ‘सुपर सिक्स’ टप्प्यात प्रवेश करतील. या टप्प्यात संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य सामने 4 फेब्रुवारी रोजी चट्टोग्राम येथे खेळवले जातील, ज्यासाठी 5 फेब्रुवारी हा राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. अंतिम सामनाही 6 फेब्रुवारी रोजी चट्टोग्राम येथेच खेळवला जाईल, ज्यासाठी 7 फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आह
गटरचना : ‘अ’: भारत, आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि नेपाळ, ‘ब’: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि सामोआ, ‘क’ : ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात, ‘ड’ : इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड.





