ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन

मुलचेरा : राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी प्रत्येक नागरिकाने महा आयडी (Maha ID) तयार करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.

महा आयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी एकाच लॉगिनद्वारे प्रवेश मिळतो. यामुळे कागदपत्रांची वारंवार पडताळणी टाळता येते, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी व जलद होते तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

महा आयडी तयार करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी (असल्यास) आवश्यक आहे. शिक्षण, शेती, रोजगार, महिला व आर्थिक मदत अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा आयडी उपयुक्त ठरत आहे.

नागरिकांनी लवकरात लवकर महा आयडी नोंदणी करून शासनाच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे