ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पेंढरी रोडवर अनियंत्रित कारने मारली पलटी 2 जखमी

धानोरा
गडचिरोली वरुन निघालेली कार पेंढारी गावाजवळ वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पडलटून झालेल्या अपघातात 2 गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक 6जुलै 2026 ला सकाळी 10.00च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कोआँपरेटिव्ह बँक शाखा पेंढरी येथील कर्मचारी गडचिरोली येथे राहतात.दररोज कारने पेंढरी येथे येजा करतात पण काल दिनांक 6 जुलैला कोआँपरेटिव्ह बँकेचे चार कर्मचारी आणि तलाठी पेंढारी येथे कर्तव्यावर जात असताना पेंढारी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटली आणि 2 कोआँपरेटिव्ह बँकेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने बँक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
टाटा मोटर कंपनीच्या कारने तिनं परक्या मारल्या. गाडी क्रमांक MH34V3610 असून इतर सर्व सुखरूप आहेत.तर दिनकर कोडाप आणि सुभाष पेंदाम हे गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील नोबेल हाँस्पिटल मधे भरती करण्यात आले असल्याचे कळते.