सिरोंचा :-
धर्मापुरी-शिरोंचा मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भव्य *तन्वी MRF टायर शो-रूम* चा उद्घाटन सोहळा शिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या नवीन शो-रूममुळे शिरोंचा शहर आणि परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे.
ग्राहकांना उच्च दर्जाचे टायर्स आणि वाहनांशी संबंधित इतर महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शो-रूमची सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, शिरोंचा आणि ग्रामीण भागातील वाहनधारकांना आता चांगल्या सेवेसाठी लांब जाण्याची गरज पडणार नाही, हे शो-रूम सर्वांसाठी अत्यंत सोयीचे ठरेल.
मान्यवरांची मोठी उपस्थिती:
या शुभारंभ सोहळ्याला सुभाष व्यास, कम्बगौनी राजबाबू, नगरसेवक सतीश बोगे, नगरसेवक नरेश अलोने, शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवी बोंगोनी, मारुती भाऊ गणपुरावू, शंकर तडकापल्ली, कुंदरपू गट्टू, सागर कांबागोनी, नागेश जन्नम, येल्लेश बानाला, तसेच रामकृष्णा नडीगोटा यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला आणि वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘तन्वी MRF टायर शो-रूम’च्या संचालकांना भेट देऊन व्यवसायाच्या भरभराटीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.





