गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या मातंग समाजातील अनुसूचित जातीच्या मांग, मातंग, मादगी, मादीगा व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गुणवत्तेनुसार निवड झालेल्या प्रथम ५ ते ७ विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीनुसार शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र व बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २७ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय मागे, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. बी. गौड यांनी केले आहे.