अहेरी:
येथील कन्यका परमेश्वरी मंदिरात तान्हा पोळा कृती समितीच्या वतीने तान्हा पोळानिमित्त नंदी व नंदीधारक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या स्पर्धेला स्थानिक बालगोपालांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांनी एकापेक्षा एक सुंदर संकल्पना मांडून उपस्थितांची मने जिंकली.
हे ठरले स्पर्धेचे विजेते:
* प्रथम क्रमांक: सक्षम प्रतिक मुधोळकर – (संकल्पना: ‘जगन्नाथ पुरी रथयात्रा’)
* द्वितीय क्रमांक: सारथी सचिन पेदापल्लीवार – (संकल्पना: ‘मोबाईल टॉवरमुळे होणारे दुष्परिणाम’ – सामाजिक संदेश)
* तृतीय क्रमांक: शिवांश नितीन जयस्वाल – (संकल्पना: ‘महाभारत’)
* चतुर्थ क्रमांक: काशवी कुणाल कन्नमवार
सर्व विजेत्या बालकांना रोख रक्कम आणि आकर्षक शिल्ड (करंडक) देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक चिमुकल्याला प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य:
या स्पर्धेचे चोख परीक्षण राधेश्याम घोबाडे व सुजित बाछाड यांनी केले. या सोहळ्याला तान्हा पोळा कृती समितीचे अध्यक्ष मुरलीधर मद्दीवार, तसेच महेश मद्देर्लावार, दिलीप विश्वनादूलवार, विलास कंदोटीवार, सुधाकर टेकुल, प्रवीण पुल्लूरवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रवीण पुल्लूरवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद विश्वनादूलवार, वैभव चिमरालवार, अनिल चिलवेलवार, राकेश वायलालवार, राकेश बिरेल्लीवार, नितीन मद्देर्लावार, विजय पुसलवार, राकेश मुप्पावार, नितीन चिमड्यालवार, प्रसाद मद्दीवार, वैभव चिलवेलवार आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.





